वकिलाला न्यायालयाच्या आवारात मारहाण; खांदा फ्रॅक्चर, सोनसाखळी लांबवली

बातमी शेअर करा...

वकिलाला न्यायालयाच्या आवारात मारहाण; खांदा फ्रॅक्चर, सोनसाखळी लांबवली

 

अमळनेर (प्रतिनिधी) : न्यायालयीन प्रक्रियेत उलटसुलट प्रश्न विचारल्याच्या रागातून बहीण-भावाने वकिलाला भरदिवसा मारहाण केल्याची घटना अमळनेर न्यायालयाच्या आवारात घडली. या हल्ल्यात वकिलाचा खांदा फ्रॅक्चर झाला असून, सोनसाखळी लंपास करण्यात आली.

ॲड. प्रशांत रमेश बडगुजर (रा. विद्यानगर, धुळे रोड, अमळनेर) हे वादी रवींद्र पवार यांच्या वतीने वाटणीच्या खटल्यात वकिली करत आहेत. दि. ४ रोजी प्रतिवादी मीनाक्षी कैलास भामरे यांची उलट तपासणी पूर्ण झाल्यानंतर वकिलाबरोबर हा प्रकार घडला.

वकिल बडगुजर हे न्यायालयाच्या आवारात असताना राजेंद्र पवार तेथे आला व “माझ्या बहिणीला उलटसुलट प्रश्न का विचारले?” असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये बडगुजर यांचा खांदा फ्रॅक्चर झाला. तसेच, मीनाक्षी भामरे हिनेही त्यांना चपलेने मारहाण केली.

यावेळी राजेंद्र पवार याने बडगुजर यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोनसाखळी ओढून आपल्या मित्राकडे दिली. तसेच, न्यायालयीन बँड तोडून नुकसान केले. जाताना बहीण-भावांनी वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Join WhatsApp Group