
वक्फ बचाव समिती मार्फत जिल्हाभरात जनजागरण मोहीम
वक्फ बचाव समिती गठित
जळगाव प्रतिनिधी भारत सरकारने खासदार, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक संघटन, करोडो लोकांनी इ मेल व निवेदना द्वारे वक्फ संशोधन बिलाला विरोध करून सुद्धा सरकारने हुकूमशाही पद्धतीने वक्फ कायदा १९९५ मध्ये संशोधन करून त्याला समाप्त करून उम्मीद २०२५ या नावाने वक्फ चा नवीन कायदा अमलात आणला.
कायदा कसा संविधान व मुस्लिम विरोधी आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी व त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी मुफ्ती खालिद यांच्या नेतृत्वात मुफ्ती अबूजर, मौलाना अख्तर नदवी ,मुफ्ती रमिज, मुफ्ती रेहान, मौलाना वसीम पटेल, मौलाना एजाज, मौलाना शफीक पटेल, मौलाना कासिम नदवी , मौलाना उमेर, मौलाना रहीम पटेल, मौलाना शफीक रहेमानी तसेच शहरातील विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा समावेश करून १० एप्रिल पासून बचाव समितीची स्थापना जळगाव शहरात झाली आहे.
समितीद्वारे जनजागरण मोहीम
वक्फ बचाव समिती मार्फत जळगाव शहरात विविध भागात कॉर्नर मीटिंग द्वारे वेगवेगळ्या समाजातील लोकांमध्ये वक्फ कायदा १९९५ काय होता व नवीन कायद्यामध्ये काय तरतूद केलेली आहे ती कशी संविधान विरोधी आहे व कशा प्रकारे भारताचे गृहमंत्री अल्पसंख्यांक मंत्री हे दिशाभूल करीत आहे. तसेच खरे व खोटे काय आहे हे पटवून देण्यासाठी जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरात विविध ठिकाणी कॉर्नर मिटिंग
जळगाव शहरात विविध ठिकाणी कॉर्नर मीटिंग होत असून त्यात मौलाना उमेर,मौलाना कासिम नदवी , मौलाना तौसिफ शाह, मुस्तफिझ शकील, अहेसान असलम व त्याचे सहकारी प्रामुख्याने हे जनजागरण करीत आहे.
जिल्हाभरात जनजागरण मोहीम
जिल्हाभरात वक्फ बचाव समिती मार्फत मुफ्ती खालिद यांच्या नेतृत्वात फारुक शेख, आरिफ देशमुख, मजहर खान , अन्वर खान, अनिस शहा, मतीन पटेल, युसुफ खान,नजमुद्दीन शेख, अमजद पठाण, हे परिश्रम घेत आहे.
शनिवारी अडावद व चोपडा येथे सभा पार पडल्या असून भुसावळ, एरंडोल, यावल, अमळनेर या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
*जिल्हाभर वक्फ बचाव साठी आंदोलन होणार*
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मार्फत हे आंदोलन होणार असून बोर्डाने १० एप्रिल ते ७ जुलै पर्यंत लोकशाही मार्गाने संविधान ने दिलेल्या हक्काप्रमाणे व कायदा विरोधात आंदोलन करण्याचे आदेशित केले असून त्यात प्रामुख्याने निदर्शने, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, रेल रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन असे विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व समाज बांधवांनी या मोहिमेत भाग घ्यावा – फारुक शेख
ज्याप्रमाणे लोकसभा व राज्यसभा मध्ये सर्व समाजाच्या खासदारांनी या वक्फ संशोधन बिलाला खुल्या प्रमाणात विरोध दर्शविला कारण हे हिंदू विरुद्ध मुस्लिम नसून फक्त राजकीय वर्चस्वाची हुकूम शाही असल्याने जिल्ह्या भरातील सर्व समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन या कायद्याला विरोध करावा असे आव्हान आयोजकांतर्फे मुफ्ती खालिद, फारुख शेख व समितीने एका पत्रकाद्वारे केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम