वज्रनाद वाद्य पथकाचा वाद्यपूजन सोहळा थाटात पार 

बातमी शेअर करा...

वज्रनाद वाद्य पथकाचा वाद्यपूजन सोहळा थाटात पार 

१५५ वादकांचा सहभाग; पारंपरिक वाद्यसंगीत जपण्याचा संकल्प

जळगाव : शहरातील वज्रनाद वाद्य पथकाचा पहिला वाद्यपूजन सोहळा रविवार, २३ जून २०२५ रोजी खान्देश सेंट्रल मॉल येथे मोठ्या जल्लोषात व पारंपरिक थाटात संपन्न झाला. या वेळी वाद्यपथकातील तब्बल १५५ वादकांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये १२० मुले आणि ३५ मुलींचा समावेश आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले उपस्थित मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. मुख्य अतिथी म्हणून शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी, विश्व हिंदू परिषदेचे ललित चौधरी, अनुभूती शाळेच्या जनसंपर्क अधिकारी रुपाली वाघ, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे, प्रदेश सचिव अमित सोळुंखे, सोहम खडके, भाजयुमोचे कल्पेश सोनवणे, दिलीप नाझरकर आणि तरुण कुढापा मित्र मंडळाचे प्रशांत सुरळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज चौधरी यांनी केले.

वज्रनाद वाद्य पथक हे शहरात नव्याने स्थापन झालेले असून, त्यांचे हे पहिले वर्ष आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती यांसारख्या विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक सण-उत्सवांत हे पथक आपल्या वादनाची झलक सादर करणार आहे.

पारंपरिक वाद्यसंगीत आणि मराठी अस्मितेचा अभिमान युवकांमध्ये जागृत ठेवण्यासाठी वज्रनाद वाद्य पथकाचे कार्य अविरत सुरू आहे.

या यशस्वी सोहळ्याच्या आयोजनासाठी सोनू चंदन, अविनाश साली, मनीष पाटील, हरीश गजलवार, मोहित पाटील, सिद्धार्थ पाटील, रोहित कोळी, विजय ठाकूर, सिद्धार्थ कव्हाने यांनी विशेष मेहनत घेतली.

पथकात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सोनू चंदन (मो. ७३८५५१९१६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाद्य पथकातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम