
वडती गावातील रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रारीची चौकशी पक्षपातीपणाची तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गावकऱ्यांची मागणी
वडती गावातील रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रारीची चौकशी पक्षपातीपणाची तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गावकऱ्यांची मागणी
चोपडा , (प्रतिनिधी)वडती येथील रेशन दुकानदाराची चौकशी करताना तक्रारदार यांना कोणतीही पूर्व सूचना व दूरध्वनी न करता परस्पर चौकशी करून दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चौकशी अधिकाऱ्यांनी केल्याच्या आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला आहे सदर स्वस्त धान्य दुकानदाराची नव्याने चौकशी करण्यात यावी व चौकशीत पक्षपातीपणा करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी वडती गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांना एका पत्रांमुळे केली आहे याबाबत त्यांची पत्रकात स्पष्ट केले आहे की वैष्णवी सोसायता समूहातर्फे रेशन दुकान वडती गावात चालवले जात आहे याविषयी गावकऱ्यांनी दुकानदाराच्या मनमानी व गैर कारभाराविषयी तक्रार दिल्या होत्या त्या तक्रारीची चौकशी साठी पुरवठा अधिकारी गावात जाऊन दहा-पंधरा लोकांना बोलून चौकशी अहवाल तयार करून पक्षपातीपणा केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे गावात 4000 लोक असून 420 रेशन कार्ड धारक असल्यावर कोणालाही न बोलवता तसेच तक्रारदारांना कोणतीही माहिती न देता सदरील रेशन दुकानदाराशी संबंधित जेवडीक लोकांना बोलवून अहवाल तयार करून दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी हा चौकशी अहवाल आम्हाला मान्य नसून दुकानदाराची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडती गावातील गावकऱ्यांनी केली आहे शिवाय लोकांना विश्वासात न घेतले त्या संबंधित चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम