वढोदा वनक्षेत्रात अतिक्रमित झोपड्यांवर वनविभागाची धडक कारवाई

बातमी शेअर करा...

वढोदा वनक्षेत्रात अतिक्रमित झोपड्यांवर वनविभागाची धडक कारवाई

मुक्ताईनगर

मुक्ताई- भवानी अभयारण्य तथा वडोदावढोदा वनक्षेत्रातर्गत मोरझिरा नियतक्षेत्रात अतिक्रमण धारकांवर वनविभागातर्फे आज धडक कारवाई करण्यात आली.
वनक्षेत्रातील मोर्झिरा येथील अतिक्रमण धारक ह्यांनी अनधिकृत रित्या कब्जा केलेल्या कक्ष क्रमांक ५६७ येथील जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचीं कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६७ च्या उक्त कलमांना अनुसरून करण्यात आली आहे .

सर्व अतिक्रमण धारकाना नोटीसीद्वारे कळविण्यात येऊन त्यांना अनधिकृत कब्जे बद्दल आवश्यक ते दस्त ऐवज सादर करण्याच्या संधी देण्यात आली होती
तसेच योग्य ती दस्त ऐवज सादर न करु शकल्यास स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्या बाबतचे आवाहन करण्यात आले होते .
तरी वरील कोणत्याही बाबीस सदर भागातील १६ अतिक्रमण धारकांनी प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी ९.१५ ते २ वाजेपर्यंत अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

कारवाई निनू सोमराज धुळे वनसंरक्षक,मा. प्रवीण ए .उपवनसंरक्षक जळगाव वनविभाग, यू एम बिराजदार सहाय्यक वनसरंक्षक, ह्यांचे मार्गदर्शनाखाली…वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे  वनक्षेत्र, मुक्ताईनगर क्षेत्राचे कृपाली शिंदे ,यासह वनपाल भावना मराठे,वनपाल गणेश गवळी वनपाल,गस्ती पथकाचे वनपाल योगेश दिक्षीत , वनपाल दिपश्री जाधव, वंदना कोळी ,वनरक्षक मोरे ,कोळी,स्वप्नील गोसावी ,गोकुळ गोसावी ,दिपाली बेलदार ,दीपाली शिर्के .रजनीकांत चव्हान,उमेश तायडे,तुळशीराम घरजाले व SRPF टीम ह्यांनी सरपंच व पोलिस पाटील मोरझिरा व ग्रामस्थ ह्यांचा मदतीने पार पडली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम