सावदा येथे वयोश्री योजने अंतर्गत भरले गेले अर्ज
वयोश्री योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये
सावदा येथे वयोश्री योजने अंतर्गत भरले गेले अर्ज
या योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये
सावदा l प्रतिनिधी
येथे मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयात अर्ज भरण्यात आले. या योजनेत 65 वर्ष वयाचे वरील जेष्ठ नागरीकांना आरोग्य संबंधीत अडचणी साठी राज्य शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
या योजने साठी शहरातील अनेकांनी अर्ज भरले. यासाठी अर्ज, आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका इ. कागदपत्रे सादर करावी लागत आहे.
सदर योजने कामी सावदा ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता यात सुमारे 500 चे वर अर्ज नागरिकांनी जमा केले.
यावेळी मंगेश गुरभैय्ये आरोग्य सेवक, एच पी भंगाळे आरोग्य सेविका, दिपक कोष्टी औषध निर्माण अधिकारी आदींनी सदर कामात सहभाग नोंदविला व अर्ज भरून घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम