वरखेडी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; एक जण ताब्यात

बातमी शेअर करा...

वरखेडी येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; एक जण ताब्यात

पाचोरा | प्रतिनिधी

पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी वरखेडी येथील बाजारपेठेत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी २७,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना वरखेडी बाजारपेठेत काही इसम ऑनलाईन चक्री नावाचा जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.

१ एप्रिल रोजी मंगळवारी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर व त्यांच्या पथकाने वरखेडी येथे जाऊन गुप्त माहितीची खातरजमा केली. संशयित सागर चौधरी हा कॉम्प्युटरच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने चक्री नावाचा सट्टा चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.

२७,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस नाईक अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला सॅमसंग कंपनीची एलईडी स्क्रीन,सीपीयू, केबल, अ‍ॅडेप्टर, कीबोर्ड, माऊस, १,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण २७,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी हे अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम