वरणगावात गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...

वरणगावात गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव, ता. भुसावळ: गुप्त माहितीच्या आधारे वरणगाव पोलिसांनी आज (६ सप्टेंबर) सकाळी बोहर्डी खुर्द शिवारात मोठी कारवाई केली. हरताळा रोडजवळील नाल्याच्या काठावर सुरू असलेली एक गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली असून, या कारवाईत ४३ हजार २५० रुपये किमतीचा अवैध दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळी सुमारे ७ वाजता सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना बोहर्डी खुर्द शिवारात अवैध दारूभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. सपोनि बागुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी रविंद्र ज्ञानदेव गोपाळ (वय ४०, रा. बोहर्डी बु., ता. भुसावळ) याला दारू तयार करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई सपोनि अमितकुमार बागुल, पोलीस प्रशांत ठाकूर, यासीन पिंजारी, मनोज म्हस्के आणि चालक पोलीस उपनिरीक्षक इस्माइल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम