वरणगाव प्रकरणातील दोषी भू – माफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करून गजाआड करण्याची मागणी

दै. बातमीदारच्या हाती लागल्या लाखो रुपयांच्या सौदा पावत्या

बातमी शेअर करा...
वरणगाव प्रकरणातील दोषी भू – माफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करून गजाआड करण्याची मागणी
दै. बातमीदारच्या हाती लागल्या लाखो रुपयांच्या सौदा पावत्या
जळगाव । प्रतिनिधी
जिल्ह्यातील वरणगाव येथे पुनर्वसन कायद्यांतर्गत निर्बंध असलेल्या गट क्रमांक ६१७/१, ६१७/२ आणि ६१७/३ या शेतजमिनीवर जिल्हाधिकारी जळगाव यांनी निर्बंध घातले असतानाही सर्रास प्लॉट विक्री व बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले आहे.
वरणगाव
वरणगाव
गैरव्यवहाराची सौदा पावती दै. बातमीदारच्या हाती
वरणगाव येथील गट क्रमांक ६१७/१, ६१७/२ आणि ६१७/३ मधील प्लॉट विक्री संदर्भातील 39 लाख 33 हजार456 रुपयांची सौदे पावती दै. बातमीदारच्या हाती लागली आहे. ही पावती मिलिंद मेढे यांनी इरफान जुम्मा खाटीक व नदीम सलीम खाटीक यांच्याकडून लिहून घेतल्याचे समोर आले आहे.
पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन
प्रमोद नामदेव कुरकुरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ६१७/१, ६१७/२ आणि ६१७/३ या शेतजमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ३१/१०/२००५ रोजी पुनर्वसन कायद्यांतर्गत
जमिनीचे हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, रूपांतरण, किंवा सुधारणा यावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. या जमिनींवर कोणतेही बांधकाम अथवा प्लॉट विक्री करण्यास बंदी असतानाही सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत आहे.
प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज
सदर प्रकरणामुळे गोरगरीबांची फसवणूक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हे ही वाचा👇
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम