वर्ध्यात मंदिरात घुसलेल्या अस्वलाकडून मूर्तींची तोडफोड

धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला जंगलात सोडले

बातमी शेअर करा...

वर्ध्यात मंदिरात घुसलेल्या अस्वलाकडून मूर्तींची तोडफोड

धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला जंगलात सोडले

वर्धा वृत्तसंस्था
जिल्ह्यातील आष्टी शाहिद तालुक्यातील बांबुरडा गावात अस्वलाने प्रवेश करून हनुमान मंदिरात धुमाकूळ घातला. या अस्वलाने मंदिरातील हनुमान मूर्तीसह शिवलिंग व अन्य मूर्तींची तोडफोड केली. वन्य प्राण्यांचा गावाच्या परिसरात वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या सुमारास गावाच्या वेशीवर असलेल्या हनुमान मंदिरात हे अस्वल शिरले. मंदिरात घडणाऱ्या हालचालींमुळे कुत्र्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली, त्यामुळे गावकरी मंदिराजवळ जमा झाले. त्यांना अस्वलाने आत मोठा गोंधळ घातल्याचे दिसले. काही वेळाने पोलिस पाटील यांनी आष्टी व तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

वनविभाग आणि पोलिसांचे पथक गावात दाखल होताच अस्वलाला मंदिरातच अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ग्रामस्थांचा गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून अस्वल मंदिरातून पळून गेले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अखेर वनविभागाच्या पथकाने विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून अस्वलाला जेरबंद केले आणि जंगलात सोडून दिले.

गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा गावातील वावर वाढला असून, बिबट्यांबरोबरच आता अस्वलही गावात दिसू लागले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम