वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

बातमी शेअर करा...

वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

महसूल विभागाच्या पथकाकडून मध्यरात्री कारवाई; स्थानिक शेतकऱ्यांची कठोर कारवाईची मागणी

 

भडगाव: भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने मध्यरात्री कारवाई केली आहे. पकडलेले ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली. या पथकात तहसीलदार शितल सोलाट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अविनाश जंजाळे, समाधान हुलहुले, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, ग्राम महसूल सेवक समाधान माळी, किरण मोरे, नितीन मोरे, विशाल सुर्यवंशी आणि चालक लोकेश वाघ यांचा समावेश होता.

या कारवाईनंतर स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वाक येथील गिरणा नदीपात्रातून पाचोरा, पारोळा आणि धुळे येथून डंपर व ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केली जाते. यामुळे या परिसरावर भडगाव पोलीस आणि महसूल विभागाने अधिक गांभीर्याने लक्ष देऊन ही अवैध वाळू वाहतूक त्वरित थांबवावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. आढळल्यास कठोर कारवाई करावी अशीही त्यांची मागणी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम