वाक येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले 

बातमी शेअर करा...

वाक येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले 

भडगाव तहसील कार्यालयाची कारवाई

भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना एक ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने सकाळी ७.३० वाजता कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे.

यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी  बोलताना दिली.

ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम जे खाटीक, अभिमन्यू वारे आदींनी केली.

यावेळी पथक हे खाजगी गाडीत रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरचा पाठलाग करत होते. परंतु ते त्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला परंतु त्यावरील चालक हा रस्त्याची व वाहतुकीची परवा न करता सुसाट पारोळ्याच्या दिशेने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर घेऊन फरार झाला. हे डंपर पळाले जरी असले तरी त्यावर येत्या काही दिवसात कारवाई नक्की होणार आहे.

तसेच गिरणा नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असे, यावेळी महसूल विभागांना माहिती देण्यात आली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम