
वाघरे गावात दारूच्या वादातून हाणामारी, तरुणावर चाकू हल्ला
वाघरे गावात दारूच्या वादातून हाणामारी, तरुणावर चाकू हल्ला
पारोळा: तालुक्यातील वाघरे गावात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादामुळे मोठी हाणामारी झाली. या घटनेत मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला, तर त्याच्या नातेवाईकांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास पंकज पाटील (वय २७) यांच्या काकांचा, गोविंदा पाटील यांचा दारूच्या नशेत काही आरोपींशी ७ सप्टेंबर रोजी रात्री वाद सुरू होता.विलास पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी शांताराम पाटील आणि अमोल पाटील यांनी त्यांच्या घरासमोर येऊन विलास यांच्या डाव्या गालावर चाकूने हल्ला केला.विलास यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपी बापू चुडामण पाटील आणि विनोद राजधर पाटील यांनी इतर दोन आरोपींसोबत मिळून त्यांच्या नातेवाईकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.आरोपींनी शिवीगाळ करत ‘तुम्हाला ठार मारू’ अशी धमकी दिली.या प्रकरणी पारोळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम