वाघूर नदीत सिंगारबर्डी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू ; भुसावळ तालुक्यात शोककळा

बातमी शेअर करा...

वाघूर नदीत सिंगारबर्डी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू ; भुसावळ तालुक्यात शोककळा

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील सिंगारबर्डी गावाजवळ वाघूर नदीत म्हशी परत आणताना युवक वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. लक्ष्मण वसंत ठाकरे (वय अंदाजे २५-३०) असे या तरुणाचे नाव असून, सकाळी सुमारे नऊ वाजता घडलेल्या या घटनेने साकेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे सकाळी म्हशी चारण्यासाठी वाघूर नदीवरील जुन्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेले होते. काही वेळाने म्हशी गावाच्या दिशेने धावत परत आल्याने त्यांनी नदीत उतरून त्या परत एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी वाघूर धरणाचे तब्बल २० दरवाजे उघडल्यामुळे नदीचा प्रवाह अचानक वाढला आणि ठाकरे प्रचंड पाण्याच्या लाटेत वाहून गेले.

ही संपूर्ण घटना त्यांचे चुलतभाऊ योगेश भगवान ठाकरे यांच्या डोळ्यासमोर घडली. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. महसूल प्रशासन व स्थानिक यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत ग्रामस्थांचा शोधमोहीम सुरुच होती.

लक्ष्मण ठाकरे हे झोपडपट्टीत वास्तव्यास होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम