वाघ नगरमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

बातमी शेअर करा...

वाघ नगरमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघ नगर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या ग्रंथालयात ‘ग्रंथप्रदर्शन’ आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक हेमराज पाटील यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. हितेश ब्रिजवासी यांनी प्रदर्शनातील पुस्तकांची माहिती दिली तसेच डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या जीवनावर ‘रामायण’ ग्रंथाचा प्रभाव कसा पडला यावर प्रकाश टाकला.

त्यांनी ग्रंथालयांच्या वापरातून आदर्श समाजनिर्मितीमध्ये डॉ. रंगनाथन यांचे योगदान अधोरेखित केले आणि वेदांमधील माहितीचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. कार्यक्रमाला समन्वयक सचिन गायकवाड, आकाश शिंगाणे, स्वप्निल पाटील, सौ. पुनम खर्चाने, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम