वाघ नगर शाळेत जागतिक लोकसंख्या दिन साजरा; विद्यार्थ्यांना लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

जळगाव / प्रतिनिधी – विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघ नगर (माध्यमिक विभाग) येथे जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना लोकसंख्या वाढीचे फायदे, तोटे, संधी आणि भविष्यातील आव्हाने यावर सखोल माहिती मिळाली.

कार्यक्रमात शीतल गायधनी यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत कुटुंब नियोजन, सकारात्मक जीवनशैली, तसेच जनसंख्येचा देशाच्या प्रगतीतील प्रभाव यावर प्रभावी मार्गदर्शन केले. विशेषतः ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी लोकसंख्यावाढीशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम