
वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाची सांगता
विद्यापीठात सामूहिक वाचन
जळगाव प्रतिनिधी
राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि. १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाची सांगता विद्यापीठात दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सामुहिक वाचन कार्यक्रमाने झाली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राद्वारा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम गेल्या १५ दिवसांपासून विविध कार्यक्रम घेवून राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आज सामुहिक वाचनाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. के.एफ. पवार, डॉ. सचिन नांद्रे, प्रा. आशुतोष पाटील, एस.आर. गोहिल, प्रा. नवीन दंदी, सुरेखा पाटील, ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक विजय आहेर व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम