वादळाचा विद्यापीठावर तडाखा : सोलर पॅनल, झाडांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा...

वादळाचा विद्यापीठावर तडाखा : सोलर पॅनल, झाडांचे मोठे नुकसान

१०० झाडे उन्मळली, ६० सोलर पॅनल उडाले, विद्युत आणि इंटरनेट सेवा कोलमडली; कुलगुरूंची तत्काळ पाहणी

जळगाव दि.१३ (प्रतिनिधी) : बुधवार दि. ११ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील १०० लहान – मोठी वृक्षे, ५० ते ६० सोलर पॅनल उडून गेले ही मोठ्या प्रमाणावर हानी झाली व विजेच्या तारा तसेच इंटरनेट सुविधा गेल्या दोन दिवसांपासून बंद होती. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी व कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी विद्यापीठ परिसरात प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी केली व तातडीने उपाययोजना सुचविल्या.

वादळामुळे विद्यापीठ परिसरातील हायवेपासून येणारा मुख्य रस्त्यावरील झाडे पडल्यामुळे हा रस्ता बंद ठेवावा लागला. मुलांचा वसतीगृहाकडून गेट कडे येणारा रस्ता देखील झाडांमुळे बंद होता. रस्त्यांवर १०० पेक्षा अधिक लहान मोठी झाडे – फांद्या कोलमडून पडली होती. त्या कारणास्तव विद्युतप्रवाह खंडीत होवून रस्त्यांवरील लाईटस् बंद होते. केमिकल टेक्नॉलॉजी इमारतीच्या छतावर बसविण्यात आलेल्या ५० ते ६० सोलर पॅनल उडून गेल्याने मोठी हानी झाली. तसेच पाणीपुरवठा देखील बंद ठेवावा लागला. विद्यापीठातील बांधकाम विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता, विद्यापीठ उपअभियंता व उद्यान अधिक्षक यांना कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी व कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी वेळोवेळी सूचना देवून अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्यावरील झाडे बाजूला करून रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला. तसेच कार्यालयीन कामकाजाचा खोळंबा होवू नये याकरीता जनरेटरवर विद्युत पुरवठा सुरू ठेवावा लागला. आज दुपारनंतर महावितरण कडून विद्युत पुरवठा सुरळीत झाला असून इंटरनेट सुविधा देखील सुरु झाली आहे.

…………………………………………

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम