![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/01/New-Project-2.jpg)
वार्षिक स्नेहसंमेलाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे मू. जे. महाविद्यालय झाले बॉलीवूडमय
महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा
वार्षिक स्नेहसंमेलाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे मू. जे. महाविद्यालय झाले बॉलीवूडमय
महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा
जळगाव
मळजी जेठा महविद्यालयामध्ये चैतन्य २०२५ वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी बॉलीवूड मधील विविध पात्रांची वेशभूषा करून महाविद्यालयामध्ये नवचैतन्य निर्माण केले. जुन्या आणि नव्या चित्रपटामधील विविध नायक-नायिका, खलनायक आणि विनोदी पात्रांची वेशभूषा करून विद्यार्थी महाविद्यालयात आले होते.
यावेळी महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली ज्यात सुमारे ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी स्पर्धकांनी आपण साकारलेल्या पात्रांचा अभिनय, डायलॉग आणि वेशभूषा यांचे परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक गुणवंत बोरसे (अक्षय कुमार – जॉनी LLB ), द्वितीय क्रमांक – सृष्टी पाचभाई आणि सायली कुलकर्णी (राज कपूर आणि नर्गिस-बरसात चित्रपट), तृतीय क्रमांक- हितेश गुरुचंद (संजय दत्त – मुन्नाभाई MBBS) आणि उत्तेजनार्थ बक्षीस-अंजली मोरे ( दीपिका पदुकोण –पद्मावती ) हे विद्यार्थी स्पर्धक विजयी झाले. स्पर्धेचे परीक्षण स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. श्रद्धा शुक्ला आणि प्रा.राजश्री महाजन यांनी केले.
स्पर्धेची बक्षिसे – वार्षिक स्नेह संमेलन प्रमुख डॉ. भूपेंद्र केसूर आणि कला शाखेचे उप प्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विविध वेशभूषा या दोन दिवस आयोजित कार्यक्रमासाठी तयार केलेल्या समितीच्या प्रमुख डॉ.विद्या पाटील होत्या.त्यांच्या सोबत प्रा.भूपेंद्र केसुर,प्रा.देवेंद्र इंगळे, डॉ.डी.आर.वसावे, प्रा.एम.पी.राठोड, प्रा.हेमलता पाटील, प्रा.वैभव भालेराव, प्रा.सुनिता तडवी, प्रा.वर्षा उपाध्ये,प्रा.विजय लोहार,अमोल देशमुख ,प्रा. योगेश बोरसे व प्रा.बालाजी राउत यांनी परिश्रम केले.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम