
वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई; तीन दिवसानंतर गुन्हा दाखल
पाच लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई; तीन दिवसानंतर गुन्हा दाखल
पाच लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
जळगाव प्रतिनिधी
बेकायदेशीररित्या ट्रॅक्टरमधून वाळूची अवैधरित्या मेहरुण भागातील पिरजादे वाड्याजवळून चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर दि. १० रोजी एमआयडीसी पोलिसांनी पकडले. पाच लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध तीन दिवसानंतर दि. १३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन त्याची मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा परिसरातून (एमएच १९, डीव्ही ८५०६) क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करणारे ट्रॅक्टरवर दि. १० जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करुन पोलीस ठाण्यात आणले.
तीन दिवसानंतर पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर मालक रोहीदास गणपत राठोड (रा. उमराव लॉन्स, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मार्केट) याच्यास चालक विशाल विक्रम भिल (रा. शिरसोली प्र.न, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम