वावडदाजवळ भीषण अपघात; दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

वावडदाजवळ भीषण अपघात; दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

 

जळगाव: जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कुरकुरे नाल्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका अपघात कसा घडला? इंद्रप्रस्थ नगर, जळगाव येथे राहणारे चिरागदीन शेख अकबर (वय ३५) हे त्यांचा भाऊ सबदर शेख अकबर यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एयू ०२४४) ने वावडदा गावजवळून जात होते. त्याचवेळी, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९ ईडी ६८७०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही भाऊ दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी चिरागदीन शेख अकबर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुसऱ्या दुचाकीवरील चालक किशोर गोकुळ चौधरी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम