
वाहनाच्या धडकेत महिला ठार पती जखमी ; जळगाव शहरातील घटना
वाहनाच्या धडकेत महिला ठार पती जखमी ; जळगाव शहरातील घटना
जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरजवळ शुक्रवारी (२७ जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी सोमवारी (३० जून) दुपारी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव संजिदा जुम्मा तडवी (वय ४२, रा. सावखेडा सीम, ता. यावल) असे आहे. तर त्यांचे पती जुम्मा फकीरा तडवी (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. संजिदा तडवी या बचत गटाच्या सदस्य होत्या. त्या जळगाव येथे आयोजित शिबिरात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. शिबिर संपल्यानंतर त्या पतीसह दुचाकीने (एमएच १९ ईएल २५८२) घरी जात असताना अपघात घडला.
सायंकाळी सुमारे ६ वाजता प्रजापत नगरजवळ अज्ञात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, संजिदा तडवी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी जुम्मा तडवी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पिकअप चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम