
वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणावर केला धारदार शस्त्राने वार
वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याने तरुणावर केला धारदार शस्त्राने वार
वावडदा गावाजवळील घटना; एमआयडीसी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : वाहनाला कट का मारला, असा जाब विचारल्याने लोकेश धनसिंग पाटील (वय २६, रा. दहीगाव संत, ता. पाचोरा) यांना चार जणांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केला. ही घटना दि. २२ डिसेंबर रोजी वावडदा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील दहिगाव येथील लोकेश धनसिंग पाटील हे शासकीय कंत्राटदार आहे. दि. २२ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वाहनाला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वावडदे गावाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्यांनी लोकेश पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले तर लो-खंडी रॉडने मारहाण करीत गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर लोकेश पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या संशयित बंटी उर्फ दीपक पाटील, हरिष पाटील (दोघ रा. रायसोनी नगर, जळगाव) व करण पाटील (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ समाधान टहाकळे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम