
वाहन चालक ताराचंद बाविस्कर यांना उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार
वाहन चालक ताराचंद बाविस्कर यांना उत्कृष्ट वाहन चालक पुरस्कार
जळगाव प्रतिनिधी ;– ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यामध्ये महसूल विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी (SDO) नितिन कुमार मुडावरे यांचे वाहन चालक ताराचंद महारू बाविस्कर यांना उत्कृष्ट वाहन चालक म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात इतरही अनेक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यात अमळनेर येथील नायब तहसीलदार प्रशांत धमके, अव्वल कारकून अशोक ठाकरे, मंडळ अधिकारी विठ्ठल पाटील, कोतवाल मुकेश शिसोदे, आणि नगाव येथील पोलिस पाटील प्रवीण गोसावी यांचा समावेश होता.
या सत्कार समारंभाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, आमदार राजूमामा भोळे, अमळनेरचे उपविभागीय अधिकारी नितिन कुमार मुडावरे, आणि तहसीलदार रूपेश कुमार सुराणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम