
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
जळगाव दि.२९ प्रतिनिधी-
महाराष्ट्र युवा क्रीडा संचालन आयोजीत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकतर्फे आयोजीत विभागीय कॅरम स्पर्धा नाशिक येथे १६ ऑक्टोबरला पार पडली. नाशिक, जळगाव, धुळे, नगर यासह पुणे विभागातील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. जळगाव जिल्ह्यात १४ वर्षाखालील गटात विआन सुनील तलरेजा याने सहभाग घेतला होता. क्वाटर फायनल मध्ये विआन तलरेजाने साईल सोनवणे अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल याला नमविले. त्यानंतर सेमी फायनला सोहम तुषार पवार या नाशिकच्या खेळाडूला हरविले. यानंतर अंतिम सामन्यात बारयाल अली गुलाम अली मालेगाव याला नमवून विजेतेपद पटकाविले. शालेय स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लीक स्कूलचा विद्यार्थी विआन तलरेजा याला प्रिती जाजू, श्री. भूषण सर यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय विभागीय स्पर्धेत विजयी झालेल्या विआन तलरेजाची निवड रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते योगेश धोंगडे यांनी प्रशिक्षण दिले. त्याच्या या यशाबद्दल जी. एच. रायसोनी पब्लीक स्कलूच्या क्रीडा शिक्षिका प्राजक्ता खलकर, आई राशी तलरेजा, वडील सुनील तलरेजा यांच्यासह नातेवाईंकानी कौतूक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम