विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार!

रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त

बातमी शेअर करा...

विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार!

रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त

मुंबई. प्रतिनिधी – जैन इरिगेशनचे चित्रकार विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६४ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रमाणपत्र व रोख रुपये ५२, ५०० (रुपये बावन्न हजार पाचशे) रेखा व रंगकला विभागात पारितोषिक प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विकास मल्हारा यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. अॅड राहुल सुधा सुरेश नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), मा. श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील (मंत्री-उच्च व तंंत्र शिक्षण), मा. अॅड आशिष मिनल बाबाजी शेलार (मंत्री-सांस्कृतिक कार्य), मा. श्री. इंद्रनिल अनिता मनोहर नाईक (मंत्री- राज्यमंत्री उच्च व तंंत्र शिक्षण), मा. श्री. अरविंद आशालता गणपत सावंत (लोकसभा सदस्य), श्री. बी वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से, अप्पर मुख्य सचिव-उच्च व तंत्र शिक्षण), डॉ. संतोष संज्ञा भास्कर श्रीरसागर (संचालक-कला संचालनालय) महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५.३० वा. संपन्न झाला. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ४ ते १० दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांनी विकासचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून विकास मल्हारा यांना ‘बॉम्बे आर्ट सोसायटीचे गोल्ड’, ‘आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’, ‘टगोर अॅवार्ड’ व इंडिया आर्ट अॅण्ड क्राफ्ट सोसायटी िदल्ली असेही अॅवार्डस प्राप्त झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम