
“विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही” – आ. अमोल जावळे
“विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही” – आ. अमोल जावळे
वड्री –परसाळे ते यावल रस्त्याचे भूमिपूजन
यावल प्रतिनिधी
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वड्री–परसाळे ते यावल या प्रमुख ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात रविवारी पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच शेतमाल वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. आता या रस्त्याच्या विकासकामामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून हा मार्ग परिसरासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे.
या रस्त्याच्या कामासाठी आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आवश्यक निधी मंजूर झाला असून आज भूमिपूजनाच्या माध्यमातून या विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, युवक तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादाजी धुनीवाले पांडुरंग महाराज, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, नारायण चौधरी, हर्षल पाटील, राकेश फेगडे, उज्जेनसिंग राजपूत, सविता भालेराव, मुमताज फत्तु तडवी, भास्कर बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, अतुल भालेराव, मीनाताई भिरूड, सागर कोळी, पंकज चौधरी, अजय भालेराव, ललित चौधरी, तेजस पाटील, भरत पाटील, श्याम महाजन, प्रल्हाद चौधरी, ललित कोळी, तुषार चौधरी, ज्ञानेश्वर तायडे, संजय कोळी, भगवान पाटील, राजू सूर्यवंशी, कन्हैया वारके, इकबाल तडवी, आशिष मोरे, शशिकांत महाजन, उमाकांत पाटील, सिद्धांत मोरे, संदीप कोळी, शेखर कोळी, दीपक कोळी, पवन बोरोले, राहुल कोळी, सचिन फेगडे, राजू कोळी, संजय मोरे, विठ्ठल सूर्यवंशी, धनराज कोळी यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते.
“प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. विकासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे प्रतिपादन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी यावेळी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम