विकास कामे – चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आ. सौ.लताताई व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून 108 कोटी 50 लाखांची विकास कामे

आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी भागातील रस्ते व PWD ची रस्ते या विकास कामांचा समावेश

बातमी शेअर करा...

विकास कामे – चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी आ. सौ.लताताई व माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून 108 कोटी 50 लाखांची विकास कामे

आदिवासी आश्रमशाळा, आदिवासी भागातील रस्ते व PWD ची रस्ते या विकास कामांचा समावेश

चोपडा l प्रतिनिधी

जुलै पुरवणी अंथऀसंकल्पातुन नुकताच महाराष्ट्र राज्याचा आर्थिक बजेट घोषित झाला.राज्याच्या सामान्य जनतेसाठी महायुतीच्या सरकारने अनेक लोक विकास कामे व योजना यांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आलेली असून त्यात चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून

43.5 कोटी आदिवासी आश्रमशाळा व मुलींचे वसतिगृह साठी

1) वैजापूर ता.चोपडा येथे
शासकीय आश्रमशाळा शालेय इमारतीचे बांधकाम करणे. 14. 50 लक्ष
2) कृष्णापुर या. चोपडा येथे शासकीय आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम करणे 14.50  लक्ष
3) चोपडा शहरात शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह इमारतीचे बांधकाम करणे 14.50 लक्ष

50 कोटींचे आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी

15 कोटींचे सार्वजनिक बांधकाम विभाग कडून रस्ते

असा एकूण 108 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार व आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण

यांनी दिलेल्या भरघोस निधी साठी तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचेही आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम