
विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा; पुढील ३–४ तास अत्यंत महत्वाचे!
विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा; पुढील ३–४ तास अत्यंत महत्वाचे!
मुंबई | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग (IMD) मुंबईने दुपारी ४ वाजता महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तातडीचा इशारा दिला आहे. पुढील ३ ते ४ तास अत्यंत महत्वाचे असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंभीर इशारा – वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तास
या यादीत पुणे, सातारा, अहमदनगर, रायगड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश असून, या भागांमध्ये अतिवृष्टीसह जोरदार वारे आणि वीज पडण्याचा धोका आहे.
मध्यम इशारा – वाऱ्याचा वेग ३०-४० किमी/तास
जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मध्यम स्वरूपाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी घ्याव्यात पुढील काळजी
1. जनावरांची सुरक्षितता
जनावरे झाडांखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत.
विजेच्या धक्यापासून वाचवण्यासाठी मेटल शेडखाली (अर्थिंग नसलेल्या) ठेवणे टाळावे.
कोरड्या आणि सुरक्षित जागी त्यांच्या अन्न-पाण्याची सोय करावी.
2. विजांचा कडकडाट असताना वागणूक
वीज कोसळत असताना चालताना मोबाइल वापरणे टाळावे.
दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
घरात राहणेच सर्वात सुरक्षित पर्याय.
3. धोकादायक इमारतींपासून दूर रहा
जुनी, मोडकळीस आलेली किंवा बांधकाम सुरू असलेली इमारत असेल, तर त्या ठिकाणी थांबू नये.
अशा भागांमध्ये पडझड होण्याचा धोका संभवतो.
आपली सुरक्षितता, आपल्याच हाती!
हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहा. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शक्य असल्यास इतरांनाही सतर्क करा. पावसाळ्यातील अशा अचानक हवामान बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम