विजेची हाणी रोखण्यासाठी महावितरणचा अनोखा प्रयोग

अमळनेर आणि चोपड्यात १४५० वीज मीटरची तपासणी; २०३ जणांवर कारवाई

बातमी शेअर करा...

विजेची हाणी रोखण्यासाठी महावितरणचा अनोखा प्रयोग

अमळनेर आणि चोपड्यात १४५० वीज मीटरची तपासणी; २०३ जणांवर कारवाई

जळगांव I प्रतिनिधी

महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे पालकत्व असलेले कार्यकारी संचालक श्री धनंजय औंढेकर आणि मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी यांच्या निर्देशानुसार परिमंडलात विजेच्या अवैध वापराविरुध्द मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत चोपडा आणि अमळनेर उपविभागातही सातत्यपूर्वक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमेत 1450 वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात 203 सदोष मीटर धारकांवर भारतीय विद्युत कायदाप्रमाणे कारवाई करण्यात आली.

15 जानेवारी 2025 रोजी धरणगाव विभागाअंतर्गत चोपडा आणि अमळनेर शहरात विशेष मीटर तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी अमळनेर शहरात 20 पथके व चोपडा शहरात 18 पथके असे एकूण 38 पथके तयार करण्यात आलेली होती. त्यासाठी एकूण 190 कर्मचारी सहभागी होते.

अमळनेर शहरामध्ये एकूण 850 मीटरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 116 मीटरमध्ये फ़ेरफ़ार व छेडछाड करुन वीज चोरी झाल्याचे आढळून आल्याने कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे चोपडा शहरात एकूण 601 मीटरची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 203 ग्राहकांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विजेची वितरण व वाणिज्यक हाणी अधिक असणाऱ्या भागात वीज चोरीला आळा घालण्यासाठी परिमंडलात ग्राहकाच्या दारावरील वीज मीटर काढून ते रस्त्यावरील विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या ‘मल्टी मीटर बॉक्स’मध्ये बसविण्याचेही काम सुरु आहे. ते काम जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सुरु आहे. त्यानुसार गत सप्ताहात शहादा विभागात (नंदुरबार) 600 तर तळोद्यात 50 मीटर घराऐवजी मल्टी मीटर बॉक्स मध्ये बसविण्यात आले आहेत. मल्टी मीटर बॉक्स म्हणजे विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या एका मोठ्या पेठीत अनेक वीजमीटर बसविणे होय. जळगाव मंडल कार्यालय क्षेत्रामध्येही सदर मल्टी मीटर बॉक्स बसविण्याचे सूचना संबंधित विभागांना देणेत आलेल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम