
विज्ञान नाट्य महोत्सवात झाडवाली झुंबी बालनाट्य प्रथम
ए.टी. झांबरे माध्य. विद्यालयाच्या बाल कलावंतांची जिल्हास्तरावर निवड
विज्ञान नाट्य महोत्सवात झाडवाली झुंबी बालनाट्य प्रथम
ए.टी. झांबरे माध्य. विद्यालयाच्या बाल कलावंतांची जिल्हास्तरावर निवड
जळगाव – शिक्षण विभाग पंचायत समिती, जळगाव यांच्यातर्फे विज्ञान नाट्य स्पर्धा 2 सप्टेंबर रोजी प.न. लुंकड कन्या शाळा येथे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी के.सी.ई. सोसायटीचे ए.टी. झांबरे विद्यालयाचे सतीष साळुंखे लिखित आणि ज्योती पाटील दिग्दर्शित झाडवाली झुंबी या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून बहुमान मिळवला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी 10 शाळांनी या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवून उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. शिक्षण विभागाने विज्ञानातील महिला, स्मार्ट शेती, डिजिटल भारत ः जीवन सक्षमीकरण, सर्वांसाठी स्वच्छता आणि हरित तंत्रज्ञान असे विषय नाट्यासाठी दिले होते. यावेळी गटशिक्षणाधिकार्यांतनी आणि केसी ई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे,सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोडकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.या बाल कलावंतांनी सहभाग घेतला काव्या फेगडे, नताशा पवार, प्रीती मराठे, वेदिका विश्वे, हर्षदा वाघरी, भूमिका पाटील, नैतिक कुलकर्णी राज कोल्हे तर संगीतकार म्हणून धन्वी शिंपी, हर्षदा गायकवाड, मनाली पाटील, आरुषी आदमाने, कार्तिक मोरे, सहज फेगडे, दिग्विजय पाटील, प्रथमेश बारी, गौरव पाटील आदी.झाडवाली झुंबी या नाटकात हरित तंत्रज्ञान विषयावर भाष्य करण्यात आले असून झाडे तोडीवर आघात करण्यात आला आहे. झाडे जर वाचली तर वातावरणात कोणताही बदल होणार नाही त्याचप्रमाणे आपण जर जंगलाचा र्हाीस केला तर श्वापदं नागरी वस्तीत घुसून जिवंत माणसांवर हल्ला करून त्यांना नुकसान करतात. त्यामुळे हरित क्रांती घडवण्याची सध्या गरज असल्याचा विषय या नाटकात मांडण्यात आलेला आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम