विठ्ठलवाडीत घरफोडी; साडेचार हजारांची रोकड चोरी

बातमी शेअर करा...

विठ्ठलवाडीत घरफोडी; साडेचार हजारांची रोकड चोरी

जळगाव – शहरातील निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडी भागात एका तरुणाच्या घरातून चोरट्यांनी दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून सुमारे साडेचार हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भूपेश अरुण चव्हाण (वय २४) असे घरफोडी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबासोबत विठ्ठलवाडीत राहत असून शेती व्यवसाय करतो. २६ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घर बंद असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि कपाटातील साडेचार हजार रुपये चोरून नेले.

पैशांचा शोध घेतल्यानंतर काहीच हाती न लागल्याने भूपेशने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम