
विणकर समाजाच्या शिष्ट मंडळाने राष्ट्रपतिची घेतली भेट
विणकर व्यायसायिकांचे प्रश्न सोडविण्याचे राष्ट्रपतींनी दिले आश्वासन
विणकर समाजाच्या शिष्ट मंडळाने राष्ट्रपतिची घेतली भेट
विणकर व्यायसायिकांचे प्रश्न सोडविण्याचे राष्ट्रपतींनी दिले आश्वासन
सावदा l प्रतिनिधी
राजभवन मुंबई येथे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विणकर समाजाच्या प्राथमिक शिष्ट मंडळाने भेट घेतली महामहिम राष्ट्रपतीजी यांच्यासमोर देशातील समाजाचे व व्यवसाय संदर्भातील प्रश्न उपस्थित केले.
जर देशाला स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर पारंपरिक वस्त्र उद्योग शिवाय पर्याय नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर विणकर व्यवसाय खूप वाढला पाहिजे
या व्यवसायाचा खूप मोठा वाटा असेल असे मत शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपतीची यांच्यापुढे मांडले.
राष्ट्रपतीची यांनी पण नॉर्थ ईस्ट भागात पारंपरिक वस्त्र उद्योग खूप मोठ्या प्रमाणात व पारंपारिक वस्त्र उद्योग संस्कृती व कला जपत वापरत असून
पारंपारिक वस्त्रे वापरणे म्हणजे एक संस्कृती जपणे असे आहे, असे मत महामहीम राष्ट्रपतीजी यांनी मांडले.
असून या व्यवसायाच्या चर्चेसाठी
पुढील महिन्यात देशातील प्रमुख विनकर समाजाच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी घेऊन येण्यास सांगितले असून त्यासाठी विशेष वेळ देणार असे आहोत असे सांगितले आहे. सोबतच त्याच शिष्ट
मंडळाची भेट देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत करून देऊ असेही सांगितलेले आहे.
माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची आज महामहीम राष्ट्रपतीजी यांनी विशेष आस्थेने विचारपूस केली हेच माझ्यासाठी गौरव असुन शिष्टमंडळात माझ्यासोबत शैलाताई सामंत, अनिल कांबळे, ओंकार जी कलधोणे हे होते.
तरी देशातील विणकर समाजाच्या समस्या देशाचे प्रथम नागरिक यांच्या पुढे मांडल्या हेच आमच्यासाठी खूप मोठे यश असुन, विशेष बैठकीसाठी लवकरच महाराष्ट्र व इतर राज्यातील विणकारांची संपर्क साधणार
असून त्यासंदर्भात विणकर व्यवसायाच्या ज्या अडचणी असतील त्यांनी त्या तत्काळ आमच्यापर्यंत पोहोचवावेत त्या आम्ही महामहीम राष्ट्रपतीजी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडणार असून कदाचित ही बैठक दसरा ते दिवाळी या दरम्यान होणार आहे.
हे ही वाचा👇

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम