विद्यापिठात पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

विद्यापिठात पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

जळगाव: क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ उपस्थित राहतील.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान, विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागातर्फे योगाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, योग विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम