विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी
सुकाणू समिती सदस्यांकडून विद्यापीठाचे कौतुक
विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी
सुकाणू समिती सदस्यांकडून विद्यापीठाचे कौतुक
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून विद्यापीठाचे या कामकाजाबाबत सुकाणू समिती सदस्य मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आर.डी. कुलकर्णी व छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु वाल्मिक सरवदे यांनी आढावा बैठकीत समाधान व्यक्त केले.
राज्य शासनाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत सुकाणू समिती सदस्यांकडून विद्यापीठांच्या या कामकाजाबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने शनिवार दि.१८ जानेवारी रोजी दुपारी ३.०० विद्यापीठात ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र- कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य एस.एस.राजपूत, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.जगदीश पाटील, डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त महाविद्यालय), जळगावच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे हे उपस्थित होते.
प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल सादर करतांना समितीस सांगितले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्वच विद्याशाखेतील अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून ते लागू करण्यात आलेले आहेत. तसेच शासनाने सुचविलेल्यानुसार स्वयंम कोर्सेस करीता मार्गदर्शक नियमावली, मल्टीपल एन्ट्री आणि एक्झिटच्या मार्गदर्शक सूचना, कुलगुरु इंटर्नशिप प्रमोशन स्कीम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीसची कार्यपध्दती, अभ्यासक्रम पुस्तकांचे मराठी रुपांतरण, स्कूल कनेक्ट यासह विविध महत्वपूर्ण विषयांवर विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीची माहिती समितीस दिली. प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य राजपूत यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनव्दारे अभ्यासक्रम रचना व इतर मुद्यांबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील यांनी देखील मानवविज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांबाबत माहिती दिली. प्राचार्य वाघुळदे आणि प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी महाविद्यालयांकडून नव्या शैक्षणिक धेारणाच्या अंमलबजावणीचा अहवाल समितीसमोर मांडला.
समिती सदस्य प्रा. आर.डी. कुलकर्णी व प्रा. सरवदे यांनी विद्यापीठाकडून नव्या शैक्षणिक धेारणच्या अंमलबजावणी बाबत केलेल्या कार्यवाहीचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले व काही सुचना केल्या. आभार कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम