विद्यापीठाचा ३१७.९६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

अर्थसंकल्पात १७.८७ कोटी रुपयांची तुट

बातमी शेअर करा...

विद्यापीठाचा ३१७.९६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

अर्थसंकल्पात १७.८७ कोटी रुपयांची तुट

जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२५-२६ च्या ३१७.९६ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला गुरूवार दि २० मार्च रोजी अधिसभेच्या बैठकीत मान्यता पेण्यात अवली. या अर्थसंकल्पात १७.८७ कोटी रुपयांची तुट दर्शविण्यात आली आहे.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. व्यवस्थापन परिषय सदस्य नितीन झाल्टे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सविस्तर अर्थसंकल्पीय अभिभाषण करतांना विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेत मागील अर्थसंकल्पातील तरतूदींचा मागोवा देखील घेतला. सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प २८९ १६ कोटींचा होता. गतवर्षी ११.५५ कोटींची

तूट दर्शविण्यात आली होती. विभागचार आढाव्यानंतर सुधारित म्हणून १८.०४ कोटी तुटीचा सादर करण्यात आला. अर्थसंकल्पाचा फुगवटा कमी करणे हा दृष्टीकोन समोर ठेऊन यावर्षीच्या अर्थसंकल्पात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. गंदाचा अर्थसंकल्प २१७. ९६ कोटी एवढा असून तूट १७.८७ कोटी एकटी आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत तूट १.६८ कोटींनी कमी झाली आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी विविध विषयांवरतसेच अर्थ संकल्पावरील चर्येत भाग घेऊन काही उपयुक्त सूचना केल्या. सभा सार्यकाल उशीरापर्यंत सुरु होती. आजच्या बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात नितीन ठाकूर, निशांत रंपे, केदारनाथ कवडीवाले, सुनील निकम, प्रा. जयवंत मगर, प्रा. धीरज वैष्णव यांच्या प्रश्नांना व्य.प. सदस्य डॉ. शिवाजी पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अमोल पाटील, प्रा. गोमेश पाटील, प्रा.म.सु. पगारे, प्रा.एस. टी. भुकन यांनी उत्तरे दिलोत. या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचलन कुलसचिव डॉ. विनोद पाटील गांनी केले.

कोटी, योजनांतर्गतविकासासाठी ४९.३५ कोटी आणि विशेष कार्यक्रम व योजनांसाठी ६०.५० कोटी तरतूद आहे. ३१७.९६ कोटींचा या अर्थ संकल्पात महसूली खर्च म्हणून तब्बल १८१.०७ कोटी, भांडवली तरतूद २७.०४ कोटी असून योजनांतर्गतचा विकासात्मक बाबींवरील खर्च ४९.३५ कोटी असून इतर विशेष कार्यक्रम व योजनांतर्गत मिळणाऱ्या अनुदानांतर्गतचा खर्च म्हणून ७.५० कोटी दर्शविण्यात आला आहे.

या आर्थिक वर्षात नवीन सहा महत्वाकांक्षी योजनांना प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रतिभा प्रोत्साहन (विकास) योजना, भारतीय ज्ञान परंपरेच्या विषयाला आणि संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा कक्ष सुरु करणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्त विशेष कार्यक्रम, दुरस्थ शिक्षण विभाग स्वतंत्रपणे सुरु होणार, विद्यापीठ परिसर शैक्षणिक सहल प्रकल्पासह खान्देशातील भूमीपुत्र, उद्योजक आणि विद्यापीठाचे विद्यार्थी मुंबई, पुणे आणि देशात वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवीत आहेत. या सर्वांना विद्यापीठासोबत जोडण्यासाठी आणि त्यांचा विद्यापीठाच्या विकासात सहभाग वाढविण्यासाठी फ्रेंड्स ऑफ युनिव्र्व्हसीटी उपक्रम राबविला जाणार आहे.

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून या अर्थसंकल्पात कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेच्या रक्कमेत २.५० कोटीवरून ३.०० कोटी अशी भरघोस वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थी विकास विभागासाठी ६९७ लाखांवरून ७७० लाख, क्रीडाविभागासाठी २०९ लाखांवरून २२० लाख, रा.से.यो. साठी ४९ लाखांवरून ६० लाख आणि विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व प्राध्यापकांसाठीच्या कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी ६० लाखांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम