विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील सेवानिवृत्त

कुलगुरू यांच्या उपस्थितीत दिला निरोप

बातमी शेअर करा...

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील सेवानिवृत्त

कुलगुरू यांच्या उपस्थितीत दिला निरोप

जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील दि. २९ मार्च रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले.

विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील हे नियत वयोमानानूसार विद्यापीठाच्या सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत. डॉ. सुनील पाटील यांना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगरु प्रा.एसटी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. सुनील पाटील हे सहकुटूंब उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना, मागासवर्गीय संघटना व उमवि पतपेढीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम