विद्यापीठाच्या दिशा पाटीलला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

बातमी शेअर करा...

विद्यापीठाच्या दिशा पाटीलला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची क्रीडापटू असलेल्या दिशा पाटील या विद्यार्थिनीने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये बॉक्सिंग क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीनंतर दिशा पाटील हिने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरूंनी तिच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक करत, पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांनी सांगितले की, “विद्यापीठातील प्रत्येक खेळाडूला आवश्यक ते आर्थिक पाठबळ, सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. दिशा पाटीलचे यश हे सर्व विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे.”

यावेळी प्र. कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, क्रीडा विभागाचे संचालक दिनेश पाटील, प्रा. नितीन बारी, विजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची क्रीडापटू असलेल्या दिशाने भरतपूर (राजस्थान) येथे २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरच्या दरम्यान झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. ६३ किलोग्रॅम वजनी गटातील बॉक्सिंग क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यात दिशाने हरियाणाच्या खेळाडूवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवत विद्यापीठाचे नाव उंचावले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दिशा पाटील हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कुलगुरू सरांचे मार्गदर्शन, विद्यापीठाची वेळोवेळी मिळणारी मदत, तसेच क्रीडा विभागाचे प्रोत्साहन यामुळेच मला हे सर्व शक्य झाले. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील सुवर्ण पदकानंतर माझे लक्ष्य आता देशासाठी खेळणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकणे आहे.” अशी प्रतिक्रिया दिली
======================

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम