विद्यापीठाच्या बी.कॉम. (रिटेल) अभ्यासक्रमासाठी व्यावसायिकांशी संवाद : कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची पुढाकाराने बैठक

बातमी शेअर करा...

विद्यापीठाच्या बी.कॉम. (रिटेल) अभ्यासक्रमासाठी व्यावसायिकांशी संवाद : कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची पुढाकाराने बैठक

जळगाव, (प्रतिनिधी):
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने बी.कॉम. (रिटेल) या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक व्यावसायिकांशी संवाद सभा रोटरी भवन, जळगाव येथे २२ मे रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, महाराष्ट्र राज्य अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम उपसमितीचे अध्यक्ष भरत अमळकर, रोटरी क्लब अध्यक्ष विनीत जोशी, नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरीया, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांची उपस्थिती होती.

विद्यापीठाच्या पुढाकाराने स्थानिक उद्योग व व्यवसायांच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना रोजगारोन्मुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने बी.कॉम. (रिटेल) हा चार वर्षीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अप्रेंटिसशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक व्यावसायिकांनी पुढे येऊन मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कुलगुरूंनी यावेळी केले.

रोजगार व शिक्षणातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न

या वेळी बोलताना भरत अमळकर यांनी स्पष्ट केले की, औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि शिक्षण व्यवस्था यामधील दरी भरून काढण्यासाठी अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्याची ही संधी असून, यामुळे त्यांची रोजगारक्षमता वाढेल.

उपस्थित मान्यवर आणि विचारमंथन

या बैठकीस नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, व्यवस्थापन शास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे, पीजी प्रमुख प्रा. रमेश सरदार, यांच्यासह शहरातील १९ व्यावसायिक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक विनीत जोशी यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम