विद्यापीठात शोधूया स्वत:ला, समजूया स्वत:ला” या विषयावर कार्यशाळा

विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करुन भविष्य घडविणे

बातमी शेअर करा...

विद्यापीठात शोधूया स्वत:ला, समजूया स्वत:ला” या विषयावर कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करुन भविष्य घडविणे
जळगाव I प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेतील इलेक्ट्रॉनिक्स विभागात “शोधूया स्वत:ला, समजूया स्वत:ला” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत शहादा येथील डॉ.उल्हास सोनवणे, प्रा.खेमराज पाटील, यांनी मार्गदर्शन केले. प्रशाळेचे संचालक प्रा.जयदीप साळी अध्यक्षस्थानी होते. विभागप्रमुख डॉ.डी.जी.शिराळे, संयोजक डॉ.जसपाल बंगे, सहसंयोजक डॉ. राहुल साळुंके, एम.एस.नेतकर यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्षदा साळुंके या विद्यार्थिनीने केले. ४ सत्रामध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करुन आपल्यातील गुणवैशिष्ट्यांचा शोध घेऊन उज्ज्वल भविष्य घडवणे हा कार्यशाळेचा हेतू होता.५०विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम