
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात सामंजस्य करार
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्य वेतनासंदर्भात सामंजस्य करार
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात दि. १३ सप्टेंबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतना संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः विमा संरक्षणासह कर्मचारी कल्याणाशी निगडित बाबींना अधिक बळ मिळणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये समाधानाची भावना निर्माण होईल,
असा विश्वास यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केला आहे. या करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विनोद पाटील आणि बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे झोनल मॅनेजर प्रवीणकुमार सिंग यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. एस.टी. इंगळे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रविंद्र एन. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य व आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅड रिसर्च, शिरपूरचे प्राचार्य डॉ. संजय जे. सुराणा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल पी. डोंगरे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे नियोजन अधिकारी विक्रम गिते व शाखाधिकारी अभिनव आर्या उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम