
विद्यापीठात अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओचे उद्घाटन
विद्यापीठात अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओचे उद्घाटन
जळगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेत आज अत्याधुनिक दृकश्राव्य स्टुडिओचे उद्घाटन कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ११ वाजता पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, तसेच प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन करण्यात आलेल्या या अत्याधुनिक स्टुडिओमध्ये व्हिडीओ एडिटिंग, टेलिप्रॉम्प्टर, आवश्यक प्रकाशयंत्रणा यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध असून, एम.ए. व बी.ए. मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम अभ्यासक्रमासह इतर कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा अनुभव मिळणार आहे. व्यावसायिक स्तरावरील स्टुडिओच्या प्रतिकृतीसारखा हा सेटअप विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या स्टुडिओची निर्मिती भारत सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी मानवविज्ञान प्रशाळेचे संचालक प्रा. राम भावसार, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. विशाल पराते, डॉ. राजेश जवळेकर, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, इंजि. एस.आर. पाटील, इंजि. आर.आय. पाटील, इंजि. सुनील नेमाडे, वैशाली वराडे, इंजि. आनंदगीर गोसावी, प्रा. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम