
विद्यापीठात आंतरवैयक्तिक कौशल्ये आणि कार्य व्यवस्थापन’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
विद्यापीठात आंतरवैयक्तिक कौशल्ये आणि कार्य व्यवस्थापन’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला आंतरवैयक्तिक कौशल्ये आणि कार्य व्यवस्थापन’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.म.सु. पगारे तर प्रमुख वक्त्या म्हणून या सत्रातील पहिल्या प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटक तथा व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा.डॉ. मधुलिका सोनवणे उपस्थित होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी ‘आंतरवैयक्तिक कौशल्ये आणि कार्य व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे म्हणाल्या की, आम्ही कसा संवाद साधतो यावर देखील होणारे कार्य अवलंबून असते. दुस-याचे किंवा समोरच्याचे ऐकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु वेळेनुसार ऐकणे आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता वस्तुनिष्ठपणे शहानिशा करणे देखील गरजेचे आहे. कोणतेही काम एकटयाने करण्याऐवजी टीमवर्कच्या माध्यमातून करणे महत्त्वाचे असते.
अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ. म.सु.पगारे यांनी , आंतरवैयक्तिक कौशल्ये आत्मसात केल्याने आणि कार्य व्यवस्थापनात नेमका काय फायदा होतो यासंदर्भात मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर प्रशाळेतील प्राध्यापकांनी वक्ते व अध्यक्ष यांना विविध प्रश्न विचारून सखोल चर्चा केली. या कार्यक्रमाला भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील डॉ. दीपक खरात, कृष्णा संदानशिव, भारती सोनवणे, स्नेहा गायकवाड, खेमराज पाटील, महेश सुर्यवंशी यांच्यासह प्रशाळेतील प्राध्यापक संशोधक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिभा गलवाडे यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम