विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव विषयावर राष्ट्रिय चर्चासत्र

सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजने अंतर्गत ९ विद्यार्थिनींचा सन्मान

बातमी शेअर करा...

विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव विषयावर राष्ट्रिय चर्चासत्र

सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजने अंतर्गत ९ विद्यार्थिनींचा सन्मान

जळगाव (प्रतिनिधी)- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव (सेलिब्रेटींग ट्रायबल हेरीटेज फॉर इटस आयडेंटीटी ॲण्ड एक्झिस्टन्स) या राष्ट्रीय चर्चासत्रात उद्या शुक्रवार दि. २८ मार्च रोजी सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजने अंतर्गत ९ विद्यार्थिनींचा सन्मान केला जाणार आहे.

विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सन २०२४-२५ पासून सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत अशिक्षीत किंवा अल्पशिक्षित आई वडिलांच्या कुटूंबातील प्रथमच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला हा सन्मान देण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली व्य.प. सदस्य नितीन झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने १० महाविद्यालयांमधून प्राप्त झालेल्या २३ विद्यार्थिनींच्या अर्जांची छाननी केली. त्यातून ९ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. व्य.प. सदस्य प्रा. सुरेखा पालवे, सिनेट सदस्य प्रा. किर्ती कमळजा, डॉ. विशाल पराते, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांचा या समितीमध्ये समावेश होता. ५ हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा सन्मान केला जाणार आहे. सन्मान पात्र विद्यार्थिनींचे नावे पुढील प्रमाणे १) पल्लवी बारेला (शरदचंद्रीका पाटील फार्मसी महाविद्यालय, चोपडा), २) ज्योती वसावे (महाराज जे.पी.वळवी महाविद्यालय, भडगाव),३ ) आफरीन खाटीक (राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा) ४) भाविका पाटील (आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, शिरपूर) ५) आरती पावरा (त्रिमुर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी, जळगाव), ६) अश्विनी गावीत (लोकनेते माणिकराव गावीत महाविद्यालय, विसरवाडी,ता. नवापूर), ७) पारबती पावरा, ८) वर्षा पाडवी, ९) निशा वसावे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम