विद्यापीठात गांधी सप्ताह 2025 चे आयोजन

बातमी शेअर करा...

विद्यापीठात गांधी सप्ताह 2025 चे आयोजन

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फ गांधी सप्ताह २०२५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दि. ७ ऑक्टोंबर रोजी गांधी सप्ताहच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात ‘महात्मा गांधीच्या विचारांच्या प्रभावाचा प्रवाह’ या विषयावर डॉ. जयदेव डोळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे  होते. तर विचार मंचावर विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. अतुल बारेकर हे उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. जयदेव डोळे म्हणाले की, विश्वामध्ये सर्वत्र युद्ध सुरु आहेत. या युद्धांमुळे उपासमारीसारखी परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडताहेत. या अविचारी वृत्तीवर मात करण्यासाठी जगाला महात्मा गांधीनी दिलेल्या अहिंसेचा विचार जोपासावा लागणार आहे. आजही महात्मा गांधींच्या विचाराच्या प्रभावाचा प्रवाह हा पर्यावरण, शिक्षण व राजकारण यांमध्ये प्रेरित आहे.भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांची साधी राहणी हा सुद्धा गांधीच्या विचारांचा प्रभाव असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

प्र-कुलगुरू प्रा. इंगळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महात्मा गांधींच्या विचाराची संपूर्ण समाजाला आवशक्यता आहे. सोभावतलच्या अहिंसेला पाहून महात्मा गांधींच्या विचारांची आठवण येते. महात्मा गांधींचा साधी राहणी व उच्च विचार सारणी हे तत्त्व आजच्या समाजाला प्रेरक ठरणारे आहेत गांधीजींनी सांगितलेल्या शांती अहिंसा व करूणा या विचारांचा अवलंब करून आजची युवा पिढी आत्मनिर्भर होऊ शकते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपक खरात तर प्रास्ताविक प्रा. म सु पगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल बारेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम