
विद्यापीठात “जागतिक सांख्यिकी दिन २०२५” उत्साहात साजरा
विद्यापीठात “जागतिक सांख्यिकी दिन २०२५” उत्साहात साजरा
जळगाव, दि. २८ ऑक्टोबरः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेतील सांख्यिकी विभागात “जागतिक सांख्यिकी दिन २०२५” उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक सांख्यिकी दिन दर पाच वर्षांनी २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक सांख्यिकी दिनाचा मुख्य विषय “Quality Statistics and Data for Everyone” आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने (Microsoft Teams) दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी स.१०.३० वाजता आयोजित करण्यात आला.
मुख्य विषयाला अनुसरून सांख्यिकी विभागातर्फे कथाकथन (Storytelling) आणि सांख्यिकी व्यंगचित्र (Statistical Meme Competition) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी “कथाकथन (Storytelling)” या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने ४ ते ५ मिनिटांच्या सादरीकरणातून आकडेवारीच्या आधारे एक गोष्ट सांगितली. सादरीकरणात आकडेवारीचा वापर, विश्लेषण आणि दृश्य मांडणी यावर भर देण्यात आला. “सांख्यिकी व्यंगचित्र” स्पर्धा कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी सांख्यिकी, डेटा विश्लेषण आणि संशोधनातील विनोदी अंग उलगडणारे स्वतः तयार केलेले व्यंगचित्र सादर केले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली.
कथाकथन ही स्पर्धा प्रा. डॉ. रोहन कोष्टी यांनी संचलित केली तर प्रा. रामकृष्ण शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . तर सांख्यिकी व्यंगचित्र स्पर्धा प्रा. मनोज पाटील यांनी संचलित केली तर प्रा. किर्ती कमळजा आणि प्रा. रोहन कोष्टी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन कल्याणी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंचल काबरा, विनय देसले, विवेक पाटील,मानसी देशमुख , रिया जैन यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र आणि प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत :कथाकथन (Storytelling) या स्पर्धेत B.Sc. प्रवर्गातून भाग्यश्री सवांदे (प्रथम), दीपिका तिलवणे (द्वितीय ), देवयानी पाटील (तृतीय) आणि M.Sc. प्रवर्गातून राजश्री पाटील (प्रथम), नितीनकुमार परदेशी (द्वितीय), विनय पाटील(तृतीय) यांना पारितोषिके मिळाले.
सांख्यिकी व्यंगचित्र (Statistical Meme Competition) या स्पर्धेत B.Sc. प्रवर्गातून रोहित पाटील (प्रथम), वैश्नवी सोनार (द्वितीय), मोक्षदा पाटील (तृतीय) यांनी तर M.Sc. प्रवर्गातून तृप्ती पाटील ( प्रथम), नितीनकुमार परदेशी (द्वितीय), महेश्वरी पाटील(तृतीय) यांना पारितोषिके मिळाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम