विद्यापीठात तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरूवात 

बातमी शेअर करा...

विद्यापीठात तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरूवात 

जळगाव – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात २६ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही धावपटू स्पर्धा, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, लांब उडी, भालाफेक अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धांनी क्रीडांगणावर चैतन्य निर्माण केले आहे.

उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी क्रीडा मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी क्रीडा व शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वासाला बळ देणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास कार्यकारी अभियंता राजेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिल दोहरे, क्रीडा अधिकारी सचिन निकम यांच्यासह प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी विभागांतर्गत असलेल्या विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी क्रीडांगणावर आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करण्यासाठी जोमदार तयारी दाखवली आहे.

या प्रकल्पस्तरीय स्पर्धांमधून गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय गाल्यापर्यंत वाट खुली होणार आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणे, योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शारीरिक-मानसिक विकासाला चालना देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्घाटनानंतर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांना उद्घोषणांसह सुरुवात झाली असून पुढील दोन दिवसांत सर्व सामने पार पडणार आहेत. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष समन्वय साधला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम