
विद्यापीठात बी.टेक. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परिचय कार्यक्रम
विद्यापीठात बी.टेक. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परिचय कार्यक्रम
जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्थेत प्रथम वर्ष प्रवेशित बी.टेक. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परिचय कार्यक्रम २०२५ (Induction Program 2025) चे आयोजन करण्यात आले असून आज आज दि. १ सप्टेंबर रोजी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. ए. के. गोसावी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या प्रवेश परिचय कार्यक्रम २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. उद्यापासून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे व्याख्यान, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, रोजगाराभिमुख मार्गदर्शन, योगाभ्यास व करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संचालक प्रा. ए. के. गोसावी यांनी प्रवेश परिचय कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व सांगत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थी हितासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात निश्चित सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवेश परिचय कार्यक्रमाचे समन्वय प्रा. विकास पाटील यांनी केले तर संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या विभाग प्रमुख अनुक्रमे प्रा. विकास पाटील, प्रा. जे. एस. नारखेडे, प्रा. विशाल पराते, प्रा. पी. डी. मेश्राम, प्रा. आर. एस. सिरसाम, प्रा. यु. डी. पाटील, प्रा. उदय बागले यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना विभागाबद्दल विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षा कापडणे तर प्रा. विश्वराज तायडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रशाळेतील बी टेक प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी पालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम