विद्यापीठात महेश वसावे यांचा सत्कार

बातमी शेअर करा...

विद्यापीठात महेश वसावे यांचा सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील एम.ए. हिंदी विषयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी महेश वसावे याने राष्ट्रीय स्तरावरील प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बंगाल पॅरा वॉरियर्स संघात खेळत सहभाग नोंदवला आहे.

यंदा पहिल्यांदाच अपंग खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यात आले. २४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सामन्यात बंगाल पॅरा वॉरियर्सने हरियाणाच्या पॅरा धाक्कड संघावर रोमांचक विजय मिळवला. हा सामना चुरशीचा ठरला असून बंगाल पॅरा वॉरियर्सने सात गुणांच्या फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयी संघाकडून खेळताना महेश वसावे याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

महेश वसावे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा. म.सु. पगारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. डॉ. पगारे यांनी विजयी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत महेशच्या खेळाडू वृत्तीचे व चिकाटीचे कौतुक केले.

या सत्कार कार्यक्रमाला हिंदी विभागातील डॉ. प्रिती सोनी, मराठी विभागातील प्रा. भारती सोनवणे, प्रशाळेतील कर्मचारी श्री. भरत पालोदकर, श्री. चंद्रकांत बि-हाडे, संशोधक विद्यार्थी महेश सुर्यवंशी तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम