विद्यापीठात विविध उपक्रम ; ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी

बातमी शेअर करा...

विद्यापीठात विविध उपक्रम ; ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी

जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय विभागात दि. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस, ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन व गट चर्चा असे दोन उपक्रम विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात साजरे करण्यात आले. सदर उपक्रमात सुमारे ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी झाले होते. ज्ञान स्रोत केंद्रातर्फे विद्यार्थ्यासाठी अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी, प्रा.पवित्रा पाटील, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रशेखर वाणी, विजय आहेर, प्रवीण चंदनकर आदी उपस्थित होते.

विद्यापीठात वीर बाल दिवसाच्या निमित्ताने कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वीर बाल दिवस दरवर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दहावे शीख गुरु श्री. गुरु गोबिंद सिंह महाराज यांचे सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंह व साहिबजादे फतेह सिंह यांच्या अद्वितीय शौर्य, बलिदान व धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ पाळला जात असून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, नैतिक मूल्ये, देशभक्ती व श्रद्धा निर्माण व्हावी, म्हणून हा दिवस साजरा केला जात असल्याचे ते म्हणाले.

यानंतर ज्ञान स्रोत केंद्रात आयोजित कार्यक्रमात केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी विद्यार्थ्यांना गटचर्चेचे नियम समजावून सांगत, ग्रंथवाचनाचे महत्त्व विशद केले. यावेळी अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.

भारतीय ज्ञान प्रणाली सक्षम युवक घडविण्यात समर्थ आहे का? ती जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे का? भारत खरंच विकसित होत आहे का? अशा विविध विषयांवर गटचर्चा घेण्यात आल्या. या गटचर्चेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून विजयी विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. कविता मनोहर पाटील व प्रा. योगेश माळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम